दम्यावर उपचारांनी नियंत्रण मिळविणे शक्य

वजन नियंत्रित ठेवणे, धूम्रपान, मद्यपान यापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक

जगात 300 दशलक्ष लोकांना दमा

भारतामध्ये 6 टक्के मुले तर 2 टक्के ज्ये÷ांना दमा

जागतिक दमा दिन विशेष

दम्यामुळे माणूस हैराण होतो. फुप्फुसे अरुंद होऊन त्यांना ऑक्सिजनच्या पुरवठय़ाचे प्रमाण कमी झाल्याने श्वसननलिकेला सूज येऊन दमा होऊ शकतो. त्यामुळे श्वासोच्छवास करताना त्रास होतो किंवा सतत धाप लागते. भारतामध्ये आनुवंशिकरित्या किंवा वातावरणातील घटकामुळे श्वासोच्छावासाच्या क्रियेला अडथळा निर्माण होतो. जगात 300 दशलक्ष लोकांना दमा असून त्यापैकी 37.9 दशलक्ष भारतामध्ये आहेत. याशिवाय भारतामध्ये 6 टक्के मुले आणि 2 टक्के ज्ये÷ नागरिकांना दमा असल्याचे आढळून आले आहे. भारतात प्रत्येकी 10 व्यक्तीमागे एका व्यक्तीला दमा असल्याचे आढळून आले आहे.

हवेचे प्रदूषण हे दमा होण्याचे एक कारण आहे. त्याशिवाय वाहनांमुळे होणारे प्रदूषण, खाणीमध्ये काम करणाऱयांना होणारा त्रास, फॅक्टरी व कारखान्यांतून बाहेर पडणारे दूषित पाणी व हवा, मॉस्क्मयुटो कॉईल्स म्हणजे डास प्रतिबंधक कॉईलचा व रूम पेशनर्सचा अतिवापर, रासायनिक प्रक्रिया केलेल्या उदबत्त्या ही प्रदूषण होण्याची कारणे आहेत.

दम्याची प्रमुख कारणे

तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ, तसेच कामाच्या ठिकाणी येणारा रासायनिक पदार्थांचा संपर्क यामुळे दमा होऊ शकतो. मुलांचे जन्मतः कमी असणारे वजन आणि श्वसनमार्गावरील जंतू प्रादुर्भाव, तणाव आणि शारीरिक कष्टामुळे दमा होऊ शकतो.

तसेच हवामानातील बदल किंवा दमटपणा यामुळेही दमा होतो. धूळ आणि वायू प्रदूषण, सर्दीची समस्या, वातावरणातील बदल, थंड पदार्थांचे सेवन, मानसिक ताणतणाव, धूम्रपान, मद्यपान, ऍलर्जी व आनुवंशिकता ही दम्याची प्रमुख कारणे आहेत. लहानपणी घरामध्ये अतिसूक्ष्म धुलिकणांनी तसेच झुरळ, उंदीर, मांजर किंवा कुत्र्याचे केस यांच्याशी येणारा घनि÷ संबंध यामुळेही दमा होऊ शकतो. तो लहान मुलांना लवकर होऊ शकतो. दम्याचे विशेषतः मुख्य लक्षण म्हणजे खोकला. तो कोरडा खोकला असतो, छातीत घट्टपणाची जाणीव होते किंवा वेदना होतात.

वाढते शहरीकरण हे दम्याचे आणखी एक कारण आहे. श्वास घेण्यास त्रास होणे हे दम्याचे पहिले लक्षण आहे. खोकला, सर्दी किंवा ऍलर्जी या लक्षणाने दमा सुरू होतो. श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत कठीणपणा येणे, श्वास घेताना घाबरल्यासारखे वाटणे, घाम फुटणे किंवा अस्वस्थता जाणवणे ही दम्याची लक्षणे आहेत. दमा बरा होऊ शकत नाही. परंतु तो नियंत्रित नक्कीच करता येतो.

 

आनुवंशिकतेने आजार

दमा हा आजार आनुवंशिकतेने होऊ शकतो. जर कुटुंबात कोणाला दमा असेल तर पुढच्या पिढीलाही दमा होऊ शकतो. काही रासायनिक प्रक्रिया करणाऱया उद्योगांमध्ये काम करणाऱयांना तेथील वायू आणि रासायनिक द्रव्ये यामुळे दमा होऊ शकतो. दमट हवामान, ढगाळ वातावरण यामुळेही दमा असलेल्या लोकांना त्रास होतो.

दम्याचा त्रास जाणवणाऱया रुग्णांची सर्व माहिती घेऊन छातीचा एक्सरे आणि ऍलर्जीच्या चाचण्या करून घेण्यास डॉक्टर सुचवतात. त्यातून दम्याची तीव्रता कळू शकते. रुग्णांची तपासणी करून औषधगोळय़ा किंवा इन्हेलरचा उपाय सुचवितात. मात्र शक्मयतो त्यांनी स्वतःच आपल्या जीवनशैलीत बदल करून दमा नियंत्रित ठेवावा, असे डॉक्टर सांगतात.

लवकरात लवकर उपचार करणे योग्य ठरेल

प्राणायाम, ध्यानधारणा, योगामुळे आणि मनशांतीच्या व्यायामामुळे दमा नियंत्रित होऊ शकतो. श्वास रोखून धरण्याच्या पद्धती मानसिक तणावावर मात करतात. त्यामुळे दमा असणाऱया रुग्णाने घाबरण्याचे कारण नाही. दम्याचे लवकर निदान झाल्यास लवकर उपचार होऊ शकतात. त्यामुळे त्वरित डॉक्टरांना संपर्क साधणे आणि लवकरात लवकर उपचार करणे, योग्य ठरेल.

आपले वजन नियंत्रित ठेवणे, धूम्रपान, मद्यपान यापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. जीवनशैलीत बदल करून आपल्याला दमा नियंत्रित आणता येतो.

प्रमोद सुळ्ळीकेरी

Popular Doctors

Related Articles