जागतिक ल्युपस दिवस

belagavi

10 मे हा जागतिक ल्युपस दिवस आहे. या दिवशी ल्युपस रोगाबाबत जागरूकता वाढविण्यावर भर दिला जातो. ल्युपसला एसएलई (सिस्टमिक ल्युपस एरिथेमॅटोसस, SLE) असेही म्हणतात. हा आजार प्रामुख्याने तरुण स्त्रिया आणि कधीकधी मुलांना देखील प्रभावित करू शकतो. या आजारात शरीराची संरक्षण यंत्रणा चुकून स्वतःच्या शरीराच्या अवयवांवर हल्ला करते. हे आजार वेगवेगळ्या प्रकारे येऊ शकतो आणि आणि त्यामुळे इतर रोगांसोबतही गोंधळ होऊ शकतो

या आजाराचे निदान होण्यासाठी महिने- वर्ष लागू शकते. रुग्णाला सांधेदुखी, चेहऱ्यावर पुरळ येणे यासारखे सौम्य लक्षणे पासून किडनी निकामी होणे [kidney failure], पक्षाघात [stroke]यांसारख्या गंभीर परिस्थितीं पर्यंत दिसू शकतात. त्यामुळे अवयवांचे नुकसान टाळण्यासाठी त्वरित निदान आणि उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एसएलई रोगाची लक्षणे एकाच वेळी दिसू शकतात असे नाही म्हणून निदानासाठी आधीच्या लक्षणांशी संबंध जोडणे खूप महत्वाचे आहे. कधीकधी एसएलई रोग कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये देखील होऊ शकतो. एक सकारात्मक रक्त चाचणी एसएलई चे निदान करू शकत नाही म्हणून निदान करण्यासाठी योग्य लक्षणे, मूलभूत आणि विशेष चाचण्या आवश्यक आहेत

सूर्यापासून संरक्षण, व्यायाम, योग्य आहार यासारख्या अनेक साध्या गोष्टी दुर्लक्ष करता येणार नाही. नवीन वैद्यकीय उपचार विशेषतः जैविक औषधांमुळे [Biologicals] या रोगाचे परिणाम सुधारले आहेत. कमी डोस आणि कमी कालावधीचे स्टेरॉईड जलद सुधारणा आणू शकतात त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे कारण संसर्गामुळे उपचार गुंतागुंतीचे होऊ शकतात आणि ते जीवघेणे ठरू शकतात. गर्भधारणेदरम्यान औषधांमध्ये बदल करणे आवश्यक आहे म्हणून डॉक्टरांना त्याबद्दल माहिती देणे आवश्यक आहे. एसएलई रुग्णांना सामान्य गर्भधारणा होऊ शकते. योग्य देखरेखीसह बाळाची चांगली प्रसूती करू शकतात. कधीतरी त्यांचा आजार वाढू शकतो जे औषध बदलांसह दुरुस्त केले जाऊ शकते . शरीरातील अनेक समस्या, उपचारांचा दीर्घ कालावधी या अनेक गोष्टींचा विचार करून या रुग्णांना भावनिक, सामाजिक, आर्थिक मदत करावी जेणेकरून ते रोगाविरुद्ध लढा चालू ठेवू शकतील.

एकूणच एसएलई हा एक नक्कल करणारा आजार आहे जो आपल्याला गोंधळात टाकू शकतो म्हणून तो नेहमी संशयाखाली असावे . तरुण महिला ज्यांना इतर समस्यांबरोबर किंवा त्याशिवाय सांधेदुखी आहे त्यांना एसएलई साठी संशयित करायला हवे. औषधांचे चांगले पालन करणे फार महत्वाचे आहे कारण उपचार दीर्घ कालावधीचे असू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here